कोल्हापूर राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करेल असं वाटत नाही. तशी दानत या सरकारची नाही. कोरोना काळात आघाडी सरकारने हजार कोटीचा चेक दाखवला होता. तो कुठे गेला? व्हॅक्सिन खरेदी करण्यासाठीचा तो चेक होता. तो कुठे गायब झाला माहीत नाही. त्यानंतर व्हॅक्सिनचा खर्चही केंद्रानेच केला. आता पेट्रोल-डिझेलवरील जीएसटी त्यांनी कमी केला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारने कमी केला नाही. केंद्राकडे बोट दाखवलं. शेवटी केंद्रानेच कमी केला. केंद्राने अबकारी कर कमी केला आहे. त्यामुळे पाच आणि दहा रुपयाने पेट्रोल डिझेलवरील भाव कमी होतील. आता महाराष्ट्रानेही कर कमी केला पाहिजे. अबकारी कर कमी केल्याने आपणही इंधनावरील दर कमी करू अशी काही दानत महाराष्ट्र सरकारची नाही. त्यामुळे मी काही आशावादी नाही, असं पाटील म्हणाले.
ठाकरे सरकार सकारात्मक भूमिका घेणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे. त्यांना केवळ केंद्राकडे बोट दाखवणं येतं. ते स्वत: भूमिका घेणार नाहीत. आज मला काही शेतकऱ्यांचे सकाळपासून फोन येत आहेत. केवळ 1400 रुपये जमा झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी केंद्राची वाट न पाहता 9600 कोटी दिले. केंद्राने 1800 कोटी दिली. ही एनडीआरएफची मदत सर्व देशसााठीची आहे. ती प्रातिनिधीक आहे. तुमची मदत तुम्ही केली पाहिजे असं केंद्राने म्हटलं होतं. आम्ही 9600 कोटीचा प्रस्ताव दिला. आम्हाला 1800 कोटी मिळाले. बाकीचे आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीतून काढले. यांनी केंद्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना केवळ 1400 रुपये दिले. मला सिन्नरमधून शेतकऱ्यांचा फोन आला. 1400 रुपये मिळाल्याचं सांगितलं. या शेतकऱ्याकडे अडीच हेक्टर जमीन आहे. मात्र, सर्वांना याच रेंजमध्ये पैसे आले आहेत. त्यामुळे केंद्राने अबकारी कर कमी केल्यानंतरही महाराष्ट्र सरकार अजून 5 रुपये कमी करेल असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.