जळगाव राजमुद्रा दर्पण । अमळनेर तालुक्यातील दापोरी खुर्द येथे तापी नदी पात्रात बालकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रोशन युवराज सोनवणे (वय ९) हा निंभोरा (ता. धरणगाव) येथील रहिवासी आहे.
रोशन हा मुंगसे जि.प.शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. दुपारी गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेला असता पाण्यात पाय घसरल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. चोपडा येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निंभोरा येथे रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात तीन बहिणी, आई वडील, आजी-आजोबा असा परिवार आहे.