मुंबई राजमुद्रा दर्पण। पवईत आयआयटी गेट समोर असलेल्या एक पडीक जागेत आज (गुरुवार) पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणत कचरा, प्लास्टिक आणि बांबू पडलेले होते. यामुळे लागलेली आग काही वेळेत जोरदार भडकली
स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवांनानी या आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागली होती त्या ठिकाणी आजूबाजूला मोठी रहिवासी वस्ती आहे.
सुदैवाने आगीवर नियंत्रण लवकर मिळविल्याने आग आजूबाजूच्या वस्तीत पसरली नाही. त्यामुळे मोठी हानी टळली आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.