अहमदनगर राजमुद्रा दर्पण। जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या करंजी गावाजवळ कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या ठिकाणी भावले वस्तीवर दरोडा पडला. तसेच दरोडेखोरांनी गोपीनाथ लक्ष्मण भावले वय (80) यांना लाकडाने बेदम मारहाण केली. त्यातच गोपीनाथ यांचा मृत्यू झाला. दरोखोरांनी बचाव करणाऱ्या गोपीनाथ यांच्या पत्नी शांताबाई वय (76) यांना देखील मारहाण केली. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरोडा आणि हत्येची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनीच या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची पथके नेमली असून आता गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. दरोड्यावेळी भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ लक्ष्मण भावले आणि शांताबाई गोपीनाथ भावले हे दोघेच होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा ऐवज चोरीला गेलेला नाही.