जळगाव राजमुद्रा दर्पण। भाऊबीज हा भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला पाचवा दिवस असतो. या दिवशी बहिणीच्या भावाला ओवाळते. त्याच्या दीर्घायुष्यासाठी ती प्रार्थना करते. भाऊ आणि बहीनीचे नाते अधिक घट्ट करणारी भाऊबीज आज शहरात साजरी होणार आहे. दरम्यान भाऊबीजेनिमित्य शहरात खरेदीला उदान झाले आहे. भाऊबीजेनिमित्य बाजारपेठेत बहिणीला गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेन्ड बघायला मिळत आहे. पर्स, ड्रेस, घड्याळ , मोबाईल या वस्तुंना अधिक मागणी दिसून येत आहे.
असे म्हणतात की कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी त्यांना भेटायला गेले होते, तिच्याकडे असणाऱ्या संपत्तीची पाहाणी करतो. अशी कथा प्रचिलीत आहे…