मुंबई राजमुद्रा दर्पण। 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप सचिन वाझेची पोलिस कोठडी आणखी 7 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत माजी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझेला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने वाझेची 10 दिवस कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने त्याला 6 नोव्हेंबर पर्यंतची कोठडी दिली होती.
आता शनिवारी त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि कोर्टाने त्याला आणखी 7 दिवस क्राइम ब्रांचच्या हवाली केले आहे. 49 वर्षीय सचिन वाझेला उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही ठेवण्याचे षडयंत्र आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये वाझेच्या विरोधात खंडणी मागितल्याचे आरोप सुद्धा आहेत. या प्रकरणात आणखी चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली होती.