अमळनेर राजमुद्रा दर्पण। अमळनेर येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी धरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून घ्या असे साकडे घातले. यावेळी बोलतांना खा.उन्मेष पाटील यांनी धरणाच्या कामासाठी करीत असलेला पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली. तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक तो प्रस्ताव आणि आवश्यक त्या परवानगी पत्रांची पूर्तता तातडीने करावी किंवा ९ सप्टेंबर १०१९ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे यासाठी मंत्रालयात जाऊन धरण समितीसोबत आंदोलन करावे लागले तरी आंदोलन करू, असे खासदार पाटील यांनी सांगीतले.
जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी यावेळी धरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर रणजित शिंदे,अजयसिंग पाटील, सुनिल पाटील यांनी धरणाची किंमत दरवर्षी शेकडो कोटींनी वाढत आहे असे सांगितले. यावेळी प्रशांत भदाणे, महेश पाटील, समितीच्या कार्यकर्त्या वसुंधरा लांडगे, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील, रियाज मौलाना, यांचेसह भाजप चे ऍड.व्हि आर पाटील,महेश पाटील, उमेश वाल्हे,युवा कार्यकर्ते तुषार पाटील,राकेश पाटील आदिसह समितीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.