जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहे यामध्ये विशेष म्हणजे भाजपाला बाजूला सारून महा विकास आघाडीने स्वतंत्र राजकीय खेळी करीत भाजपला गाफील ठेवत आपला महाविकास आघाडीचा तीन पक्षाचा गेम यशस्वी केला आहे. यामुळे निश्चितच जिल्हा बँकेत भाजपने कायदेशीर लढाई केल्यावर देखील अपयश येत असताना महा विकास आघाडीच्या हाती यश हाती येत आहे. मात्र या सर्व घटना दरम्यान नवे राजकीय वळण येण्याची शक्यता दाट आहे. चोपडाच्या जागेवरून राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घमासान सुरू आहे. चोपड्याच्या जागेवरून कॉग्रेस अडून बसल्याने राष्ट्रवादीची गोची झाली आहे. मात्र या जागे वरून अद्याप पर्यत राष्ट्रवादीतील नेत्यांनी दावा सोडलेला नाही. माजी विधानसभा अध्यक्ष असलेले अरुण भाई गुजराथी यांनी नुकतेच भाजप मधून राष्ट्रवादीत दाखल झालेले अग्रवाल यांना चोपड्याच्या जागेवरून जिल्हा बँकेत संधी देण्यात यावी असा हट्टाहास धरल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची राजकीय कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीचे इच्छूक अग्रवाल यांना जिल्हा बँकेत संधी देण्यासाठी कॉग्रेस उमेदवारां विरोधात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाविकास आघाडी मधील नेत्यांनी कॉग्रेस चोपड्याच्या जागेसाठी अडून बसल्याने कॉग्रेसचे उमेदवार डॉ सुरेश पाटील यांना जागा सोडली आहे. महाविकास आघाडीत कॉग्रेस अल्पमतात असताना मात्र आघाडी धर्म असल्याने राष्ट्रवादी, शिवसेनेला कॉग्रेस पुढे दोन पाऊले अधिक टाकावे लागत आहे. सर्व पक्षीय पॅनल मधून कॉग्रेसनेच सर्व प्रथम निवडणूक लढण्यास नकार दिला होता. यामुळे नेतृत्ब करणारे व सर्व पक्षीय पॅनलची मोठ बांधणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेत्यांना एकत्र आणण्याच्या रणनिती वर पाणी फेरले गेले.
आता देखील चोपड्याच्या जागेवरून कॉग्रेसने आडून टाकल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांची चोपड्याच्या जागे साठी ईच्छा असताना देखील ती नाईलाजाने कॉग्रेस करीता सोडण्यात आली आहे. ,
चोपड्याची जागा आघाडी धर्म म्हणून कॉग्रेसला सोडली आहे. मात्र राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले अरुण भाई गुजराथी यांचा शब्द देखील अंतिम आहे. त्यांनी अग्रवाल यांनाच संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व जागा वाटप झाल्या असताना मात्र चोपड्याच्या जागेवरून मोठे राजकारण रंगले आहे. या राजकीय खेळीत राष्ट्रवादी अग्रवाल यांच्या रुपात बंडखोरीं करते का ? किंवा कॉग्रेसला मनवुन चोपड्याची जागा आपल्या कडे खेचते ? पक्षाचे जेष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख असलेले शरद पवार यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी अरुण भाई गुजराथी यांच्या हट्टाहास मोडण्यात यशस्वी ठरते हे पाहणे लक्षवेधी ठरेल.