जळगाव राजमुद्रा दर्पण | ईश्वर नाना पाटील याची भारतेंदू नाट्य अकादमी लखनऊ येथे संपूर्ण महाराष्ट्रातुन निवड झाली आहे. भारतेंदू नाट्य अकादमी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था आहे. जिथून नवाजुद्दीन सिद्दीकी, राजपाल यादव या सारखे खूप मोठ मोठे कलावंत बाहेर पडले आहेत. आणि इथे प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतातून फक्त वीस विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यात महाराष्ट्रातून एकमेव ईश्वर पाटील हा एक आहे. ईश्वर हा जळगांव जिल्ह्यातील कुसुंबा या गावाचा रहिवासी आहे. त्याने नूतन मराठा महाविद्यालय इथून आपले बी.कॉम चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच एस. एस.मणियार लॉ कॉलेज मधून एल. एल.बी चे शिक्षण प्राप्त केले आहे. नाट्यक्षेत्रात प्रशांत दामले संचलित टी-स्कुल पुणे इथून अभिनयाचे शिक्षण घेतले असून २०१४ पासून नाट्य क्षेत्रात काम करत आहे. ईश्वर यांच्यावर नाट्य क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात शुभेच्यांचा वर्षाव केला जात आहे.