साडी-चोळी व पंजाबी ड्रेससह नागरिकांना ड्रेसची भेट !
पहूर, ता. जामनेर राजमुद्रा दर्पण | आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांनी पहूर येथे गावातील भगिनींसोबत सामूहिक जनता भाऊबीज साजरी केली असून याला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशमुख यांनी आजवर विविध आरोग्य तसेच सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यात आता पहूर येथे त्यांनी शनिवारी जनता भाऊबीज साजरी केली. पहूर सारख्या गावात या प्रकारचा जंबो उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला. यात उपस्थित महिलांनी अरविंद देशमुख यांचे औक्षण केले. तर अरविंदभाऊंनी गावातील तीनशे महिलांना साडी-चोळी, शंभर भगिनींना पंजाबी ड्रेस भेट म्हणून दिले. यासोबत सर्वसाधारण परिस्थिती असणार्या गावातील १०० नागरिकांना ड्रेसचे वाटप करून दिवाळीची अनोखी भेट दिली.
यावेळी अरविंद देशमुख यांनी आपल्या संक्षिप्त मनोगतात गिरीशभाऊ महाजन यांनी दिलेला समाजसेवेचा वसा आमच्यासारखे कार्यकर्ते तालुक्यात राबवत असल्याचे आवर्जून नमूद केले. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पहूरमधील बंधू-भगिनींची दिवाळी ही स्नेह, आपुलकी यांच्यामुळे गोड झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी राजधर पांढरे, बाबूराव घोंगडे, संजय देशमुख, भारत पाटील, राजू जाधव, चेतन रोकडे, अबू तडवी, संजय पाटील, भारत पाटील यांच्यासह आबालवृध्दांची उपस्थिती होती.