पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते भूमिपुजन ; परिसरातील १६ कोटींच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर
नशिराबाद / जळगाव राजमुद्रा दर्पण | नशिराबाद ही नगरपरिषद झाल्याने नशिराबादकरांना विकासाची आस लागली असून नशिराबाद शहराच्या विकासासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे असते त्या अनुषंगाने नशिराबाद शहरासह परिसरातील ९ रस्त्यांच्या १६ कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली असून यातील राज्य मार्गाच्या विस्तारीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून उर्वरित कामेही प्रगतीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. राज्य महामार्ग क्रमांक २७० च्या नशिराबाद ते सुनसगाव या मार्गाच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. या कामासाठी तब्बल २ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काही दिवसांमध्ये परिसरातील सर्वच काम पूर्णत्वाला येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे होते.
याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजन करून नशिराबाद ते सुनसगाव या राज्य महामार्ग क्रमांक २७० वर असणार्या रस्त्याचे विस्तारीकरण आणि डांबरीकरणाचे भूमिपुजन करण्यात आले. यासाठी २ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नशिराबाद परिसरातील १६ कोटी निधीचे असे आहेत रस्ते
नशिराबादला जोडून परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिराबाडचा सर्वांगीण विकास करून कायापालट करण्याचा संकल्प केलेला असून परिसरातील ९ रस्त्यांच्या कामना १६ कोटी निधी मंजूर केलाला असून सदरची कामे सद्यस्थिती त प्रगती पथावर आहेत. यात नशिराबाद ते सुनसगाव – २ कोटी ४१ लक्ष त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी ६० लक्ष निधी मंजूर असून कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे नशिराबाद ते बेलव्हाय व नशिराबाद ते धानवड या शेतकरी हिताच्या रस्त्यासाठी ३ कोटी ६० लक्ष निधी मंजूर आहे. नशिराबाद ते बेली व नशिराबाद – भादली – भोलाणे रस्त्याचे डांबरीकरण – २ कोटी ५० लक्ष , नशिराबाद ते भादली रस्त्याचे नुतनीकरण -१ कोटी ६० लक्ष , शेलगाव – कडगाव – जळगाव रस्त्याचे नुतनीकरण करणे – १ कोटी ६० लक्ष तर कडगाव जवळ पुलाचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे – ६० लक्ष असे एकूण ९ रस्त्यांच्या कामे सुरु असून लवकरच पूर्ण होतील असा विश्वास ना. गुलाबराव पाटील यांनी भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपअभियंता सुभाष राऊत, शाखा अभियंता जितेंद्र महाजन, कंत्राटदार विरू पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील , महानगरप्रमुख शरद तायडे, संगानियोचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, तत्कालीन सरपंच विकास पाटील, पंचायत समिती सभापतीपती जनाआप्पा पाटील (कोळी); उपतालुका प्रमुख दगडू माळी, शहर प्रमुख विकास धनगर, युवा सेना तालुका प्रमुख चेतन बर्हाटे, चंद्रकांत भोळे, बंडू रत्नपारखी, आप्पा धर्माधिकारी, आबा माळी आदींसह परिसरातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांनी केले. प्रास्ताविक उप अभियंता सुभाष राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉन्ट्रॅक्टर वीरू पाटील यांनी केले.