रत्नागिरी राजमुद्रा दर्पण । कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि मंडणगड या दोन्ही एसटी डेपोतील कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सोमवारी सकाळपासून सुरू केले आहे. त्यामुळे येथून सर्वच ठिकाणी जाणारी बस सेवा ठप्प झालेली आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहे.
या आंदाेलनामुळे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करु लागले आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. आता जिल्ह्यात सगळीकडे हे आंदोलन सुरू झाल्यास ऐन दिवाळी सुट्टीत प्रवासी, महिला, लहान मुले यांचे आतोनात हाल होणार असं चित्र दिसत आहे.