मुंबई राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हजर राहणार आहे. या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या भेटीत खूप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या क्रुझ ड्रग्ज केस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक प्रकरण या गोष्टी चर्चेत आहेत. समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांचा सामना दररोज सुरु आहे. पत्रकार परिषदांच्या सिलसिल्याच्या माध्यमातून दररोज आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. याच सगळ्या अनुषंगाने पवार-वळसे पाटील- मुंबई पोलीस आयुक्त यांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिनाभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. दररोज नवनवे खुलासे, दावे समोर येत आहेत. त्यात मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. मलिक दररोज नवनवे दावे करुन पुरावे सादर करतायत. मुंबई पोलिसांनीही वानखेडे यांना समन्स पाठवलं आहे. या सगळ्या अनुषंगाने पवार गृहमंत्र्यांची चर्चा करणार आहेत. तसंच मुंबई पोलिसांचाही या प्रकरणात महत्त्वाचा रोल असल्याने खुद्द पोलिस आयुक्तांशी पवार चर्चा करतील.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंग यांनी केले होते. गेले अनेक दिवस ते फरार होते. पण 1 तारखेला ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. 13 तास मॅरेथ़ॉन चौकशी झाली आणि नंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.