सिंधुदुर्ग राजमुद्रा दर्पण । नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणर नाही. दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना पात्रकमंत्री उदय सामंत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. केंद्र सध्या काय करत आहे, त्यांचे सर्व कारनामे महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. महाराष्ट्रातील मतदार याची नक्कीच दखल घेतील, आणि भाजपाला त्यांची जागा दाखवतील असे यावेळी सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेवर नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.