जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा देश आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधुमेह पसरत चालला आहे. आज पाहिलं तर प्रत्येक घरात एक तरी रुग्ण असतोच, शिवाय एकदा झाला की तो कधीच बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषध घ्यावे लागते आहे. डायबिटीज मुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, नजर कमजोर होणे. ४० पुढीलच नाही तर 30 वर्षाखाली तरुण पिढी ही गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचे दिसून येत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली व चुकीची जीवनशैली आणि आजारा विषयाची असलेली अपूर्ण माहिती, याच अनुषंगाने डायबेटीस रिव्हर्सल विषयाचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव बाग मुंबई येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड डॉक्टर राहुल मांडोळे, जळगाव क्लिनिक फ्रँचायझी ओनर डॉक्टर श्रेयास महाजन आणि क्लीनिक हेड डॉक्टर श्रद्धा महाजन माळी हे उपस्थित होते. डायबिटीस वर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधन करण्यात आली. त्यात आयुर्वेदिक पंचकर्म व डाएटच्या मदतीने डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो असं जर सांगितलं तर आयुर्वेद याविषयी लोकांच्या मनात मोठं प्रश्नचिन्ह उभ राहत. कारण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सगळ्यांनाच होते असं नाही किंवा आयुर्वेदिक मध्ये आजार बरा व्हायला खूप उशीर लागतो शिवाय आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहे, तोपर्यंत कदाचित डायबिटीस कंट्रोलमध्ये दिसेलही पण एकदा ही ट्रीटमेंट थांबली डायबिटीस कंट्रोल म्हणजेच राहील का? पुन्हा डायबिटीस होणार नाही का? अशा पद्धतीची आयुर्वेदावर नेहमी शंका दाखवली जाते. याच अनुषंगाने आयुर्वेदा विषयी असलेली शंका मनी डायबिटीज रुग्णांच्या मनात येणारा या प्रश्नांची उत्तरे म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधव बाग चे संस्थापक व संचालक डॉक्टर रोहित माधव साने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुरुदत्त आमीन पेशंट हे डॉक्टर सुहास डावकर आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड डॉक्टर राहुल मांडोळे यांनी सन २०१८ मध्ये एकूण ८२ टाईप २ डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैलीवर संशोधन सुरू केले. आयुर्वेद अँड डाएटरी मोडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट हे त्या संशोधनाचे नाव होते. टाईप २ डायबिटीस रुग्णांच्या जीवनशैली विषयाचा अभ्यास किंवा ते संशोधन असं होतं की तीन महिने डाएट बॉक्स डायबेटिस रिव्हर्स पंचकर्म ट्रीटमेंट घेऊन जे पूर्ण जीटीटी टेस्ट पास झाले होते, म्हणजेच ७५ ग्राम साखर खाऊन सुद्धा त्यांची शुगर नॉर्मल आली होती म्हणजेच या रुग्णांमध्ये रक्तातील साखर सामान्य म्हणजे काय लोकांप्रमाणे झाली होती, अशा रुग्णांना वर्षभर डायबेटीस कोणतीही औषध न देता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर एक ते पुन्हा एका वर्षाने त्यांचे जीटीटी टेस्ट करून तीन महिन्याची ॲव्हरेज दाखवणारे गोल्ड स्टॅण्डर्ड एचबीए १ सी चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक वर्षानंतर एकूण ८२ रुग्णांपैकी ७६ रुग्णांची एचबीए १ सी चाचणी नॉर्मल आली. एकंदरीत या निरीक्षणाचा निष्कर्ष पहाता ९२ रुग्ण हे वर्षभर कोणत्याही औषधांवर नसून सुद्धा त्यांची शुगर नॉर्मल आली म्हणजेच ते रुग्ण नॉन डायबेटीस झाले आहे. कारण त्यांच्यात १५ जिलेबी खाऊन जितके साखर रक्तात निर्माण होते म्हणजेच ७५ ग्राम शुगर खाऊन सुद्धा सामान्य नॉन डायबेटीस लोकांप्रमाणे शुगर पचविण्याची क्षमता निर्माण झाली आहे असे सिद्ध झाले. याचा अर्थ याचा अर्थ एकदा झाला की तो पुन्हा होत नाही हे संशोधनाद्वारे समोर आले आणि या संशोधनाला या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरची मान्यता प्राप्त झाली व सप्टेंबर २०१९ मध्ये माधव बागचे आयुर्वेदा डॉक्टर मोडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट मध्ये रिसर्च पेपर जेए पी आय च्या संशोधन प्रबंधामध्ये पब्लिक होऊन आला. याचा अर्थ भारताला सापासारखा विळखा घालून बसलेला टाईप २ डायबेटीस रिव्हर्स करण्याची त्याला परतवून लावण्याची ताकत आयुर्वेदामध्ये आहे. हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.