जळगाव राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध आणि मुख्यमंत्री असतांना त्यांनी सत्तेचा केलेला गैरवापर तसेच श्री. नवाब मलिक साहेब यांच्या आरोपांवरून असे लक्षात येते की महाराष्ट्रात दाऊदच्या माणसांना ( हस्तकांना ) देवेंद्र फडणीस यांनी अभय दिले आहे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काही लोकांसोबत मिळुन अनेक गैरव्यवहार केलेत आणि खंडण्या मागितल्या आहेत. श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या मंत्री मंडळातील महसूल मंत्री श्री. एकनाथराव खडसे साहेब यांच्यावर दाऊदच्या बायकोशी फोनवर संभाषण केल्याचे आरोप होताच फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला त्याचप्रमाणे नैतिकतेच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री. अशोक लाडवंजारी व अमोल कोल्हे यांनी केलेली आहे
पूर्वाश्रमीचे खडसे समर्थक असलेल्या अशोक लाडवंजारी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रथमच विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा मागितल्याने खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे दारूच्या अस्तकं सोबत असलेले संबंध यावरून राष्ट्रवादीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिउत्तर देत अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. यावरून भाजपा देखील राज्यभरात आक्रमक झाली आहे. ठिकाणी नबाब मलिक यांचे पुतळे दहन करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.