मुंबई राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी आणि निवड मंडळाच्या स्पर्धा केसांसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत मर्यादित एक वर्ष वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमान वयाच्या ३८ वर्ष आहेत ती आता ३९ केली. इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमान वयाचे होते ४३ वर्षे आहे ती आता ४४ वर्षे गेली चालू वर्षाच्या परीक्षा स्पर्धा परीक्षांसाठी ही मुदतवाढ असेल. १९ नोव्हेंबर रोजी एमपीएससीच्या काही स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून त्या वयोमर्यादेची अट ओलांडल्यानंतर अर्ज करता येणार नाही.
कोरोना व इतर कारणांमुळे एमपीएससीची, निवड मंडळामार्फत स्पर्धा परीक्षा गेल्या वर्षभर ऊ शकल्या नव्हत्या. परीक्षेला बसण्याची संधी ही वयोमर्यादा वाढवून द्यावी. अशी मागणी राजकीय पक्ष विद्यार्थी संघटना तसेच सामाजिक संघटना करीत होत्या. त्यावर मंत्रिमंडळाने आज वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी हि माहिती दिली. या निर्णयाने विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.