(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या शासकीय निर्बंधांच्या कडेकोट अमलबजावणी साठी जळगाव जिल्हा पोलिस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्त ठेवत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितता लक्षात घेऊन रिपल्स ऑफ चेंज फाउंडेशन व श्री रामचंद्र मिशन शाजपुर यांच्या वतीने जळगाव जिल्हा पोलिस दलासाठी १७,७६० N95 मास्कचे वितरण करण्यात आले. पोलीस मल्टिपर्पज हॉल येथे आज सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. परवीन मुंढे, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक, दिलीप पाटील, रिपल्स ऑफ चेंज फाउंडेशन व श्री रामचंद्र मिशन शाजपुरचे जिल्हा समन्वयक दत्ता जोशी, गिरीश मुंदडा, नवीनकुमार अमलानी आदी मान्यवर उपस्थित होते.