औरंगाबाद राजमुद्रा दर्पण। औरंगाबाद शहरातील उद्योजक देखील ईडीच्या निशाण्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीकडून विविध कारवाया केल्या जात आहेत. दुपारी बारा वाजल्यापासून दोन जणांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. अजुनही ईडीचे धाडसत्र सुरूच आहेत.
औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये नक्षत्रवाडी परिसराचा समावेश आहे. दोन मोठ्या उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापा टाकणे सुरू आहे. यामध्ये आपदा संपत्ती आणि मनी लाँड्रीयच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीला मिळालेल्या माहितीनंतर हे धाडसत्र सुरू आहे.