पुणे राजमुद्रा दर्पण। एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आंदोलन. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे. लहान मुलांसह महिला रस्त्यावर बसत थाळी वाजवून राज्य सरकारचा निषेध करत भीक मागो आंदोलन केले जात आहे राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनच्या पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरु ठेवणार. अशी ठेवण्याची भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
जर राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण झाले तर त्यांच्या पगारात वाढ होईल. कुटुंबाचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी त्याची मोठी मदत होईल. या मागण्या मान्य झाल्या तर हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येईल अशी भावना आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना असणारे तुटपुंजे पगार, अपुऱ्या आरोग्याच्या सुविधा यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना घरात सदस्य आजारी पडले योग्य उपचार देखील करता येत नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची बिकट स्थिती लक्षात घ्यावी तसेच आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महिलांनी केली आहे.