मुंबई राजमुद्रा दर्पण। क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुखच्या कामावर देखील मोठा परिणाम झाला होता. मुलाच्या काळजीत किंग खानने त्याचे सगळे आगामी प्रोजेक्ट लांबणीवर टाकले होते. मात्र, आता आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख पुन्हा एकदा कामावर परतला आहे. मात्र, शुटींगला रवाना होण्यापूर्वी त्याने आर्यनची जबाबदारी गौरीवर न सोपवता एका खास विश्वासू व्यक्तीवर सोपवली आहे.
‘पठाण’च्या शुटींगवर जाण्यापूर्वी शाहरुख खानने मोठा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानने त्याचा बॉडीगार्ड रवी सिंहवर आर्यन खानच्या सुरक्षेची जबाबदारी टाकली आहे. शाहरुखच्या अनुपस्थितीत रवी सिंह आर्यनची काळजी घेणार आहे. मात्र, आपला सर्वात जवळचा आणि विश्वासू माणूस आर्यनसाठी मागे ठेवल्यानंतर शाहरुख आता स्वत:साठी नवीन बॉडीगार्ड शोधणार आहे.
आर्यन खानच्या बाबतीत कुणावरही आता विश्वास नसल्याने शाहरुख खानने त्याची जबाबदारी रवी सिंहवर टाकली आहे. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. आर्यनला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरी आणण्यासाठी देखील रवी सिंहच गेला होता.