जामनेर राजमुद्रा दर्पण। महर्षी वाल्मिक कोळी समाज मंडळामार्फत महर्षी वाल्मिक जयंती आयोजित करण्यात आली होती. त्यात महर्षी वाल्मिकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कोळी समाजाने एकसंघ होऊन कार्य करावे असे प्रतिपादन प्रवर्तन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विनोद पाडळसे यांनी केले. महर्षी कोळी समाज बांधवांनी संघटित होऊन आपले प्रश्न सोडवावेत व परिवर्तन चळवळ पुढे न्यावी. कोळी समाजाने सामाजिक ताकद दाखवण्याची गरज असल्याचे मत तळेगाव येथे आयोजित महर्षी वाल्मिक जयंती निमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रमावेळी पाडळसे यांनी मांडले.
कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आत्माराम कोळी,ज्ञानदेव कोळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धनराज कोळी, संदीप कोळी, कौतिक कोळी, विकास कोळी, गोपाल कोळी, दिलीप कोळी, कैलास कोळी, रमेश कोळी, अर्जुन कोळी, दत्तू कोळी, शिवाजी कोळी, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.