वर्धा राजमुद्रा दर्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला. काँग्रेस संघटनेचं प्रशिक्षण शिबीर आज वर्धा्यामध्ये सुरू झाले. या निमीत्त काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत परत पोहवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पसरवण्याची, जनतेला समजवण्याची गरज आहे. कलम 370, आतंकवाद, राष्ट्रीयता वर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्तर द्यायला हवं. यामुळे आता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा, भाजपच्या विचारधारेमूळे संपत चालली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आम्ही परत जनतेपर्यंत पोहचवू ज्याने आज जो द्वेष पसरवला जात आहे तो बघायलाही मिळणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, की आजकाल काँग्रेसचे लोक भाजपा आणि आरएसएस मध्ये जातात. मात्र, तिथे टिकत नाही कारण काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी आहेत, तर भाजपा चे आयकॉन सावरकर आहेत. उत्तरखंडमधले काँग्रेस नेते यशपाल आर्यंचं उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा त्यांना परतन्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की भाजपमध्ये राहणं कठीण आहे, ते समाजाला बदलवू पहात आहे ते आमचा उपयोग करून घेतला जातो. त्यामूळे, काँग्रेस कार्यकर्ता जरी भाजपा, आरएसएसमध्ये गेले तरी तिथे टीकत नाहीत.