मुंबई राजमुद्रा दर्पण । आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आणि मुंबई महापालिका भिकारी आहेत, आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. मात्र महापालिका आणि सरकारकडून त्यांना साधे पिण्यासाठी पाणी देखील देण्यात आले नाही. सरकारची ही राक्षसी वृत्ती आहे, मात्र त्यांनी लक्षात ठेवावे कितीही गैरसोय झाली तरी देखील आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी पडळकर यांनी दिला आहे.
परब पुन्हा माध्यमांसमोर सांगतात की, मी कर्मचाऱ्यांसाठी 24 तास उपलद्ब असतो म्हणून असा आरोप देखील पडळकर यांनी केला आहे. सरकारने आता लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा. परब हे निर्णयाची कॉपी घेऊन आंदोलनस्थळी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आमचे अन्यायाला वाचा फोडण्याचे कामच आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.