जळगाव राजमुद्रा दर्पण । काळात थकलेली मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांच्या दारांना देखील दिलासा देण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने थकबाकीदारांत साठी अक्षय योजना आणली आहे. ते 14 जानेवारी पर्यंत पर्यंत की न भरल्यास अर्थात या रकमेवर तीन टप्प्यात 90 टक्क्यांपर्यंत पासून ते 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.
मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे झाली नाही. तसेच कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकी वसुली व्हावी तसेच थकबाकीदारांना देखील दिलासा मिळावा या उद्देशाने मनपात पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून अक्षय योजना मनपाकडून राबविण्यात येत आहे. यासह थकबाकीदारांना सवलत दिल्यास अनेक वर्षापासूनची थकबाकीची रक्कम मनपाला मिळू शकते. या उद्देशाने मनपाकडून सलग दुसऱ्या वर्षी देखील अक्षय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.