दिल्ली राजमुद्रा दर्पण। दिल्लीत प्रूदषणाची स्थिती अतिशय वाइट आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कडक शब्दांमध्ये फटकारताना जाब विचारला आहे. दिल्लीत हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार काय करत आहे? याबाबत सरकारने एक आपातकालीन धोरण तयार करावे. “प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी नेमके काय करता येईल ते सांगा? दिल्लीत दोन दिवसांचा लॉकडाउन लावता येईल का?” अशी विचारणा सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आली आहे.
नवी दिल्ली शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हटले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता पातळी आज 556 आहे, जी गंभीर श्रेणीत येते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी इशारा दिली की, पुढील 48 तास हवेची गुणवत्ता गंभीर राहील. राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळा बंद करणे, खाजगी गाड्यांवर ‘ऑड-इव्हन’ बंदी घालणे आणि सर्व बांधकामे थांबवणे यासह आपत्कालीन उपायांची अंमलबजावणी करावी