जळगाव राजमुद्रा दर्पण । “भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात अनेक ठीकाणी आंदोलने होत आहेत. कंगनाने केवळ देशाचाच नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा देखील अपमान केला आहे.
त्यामुळे सर्व सामान्यांचे मन दुखावली आहेत. तरी कंगना रावत यांचा पदमश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी अशोक एम. लाडवंजारी, प्रतिमा शिरसाठ, कल्पिता पाटील, अमोल कोल्हे, अशोक पाटील जिल्हा सरचिटणीस जळगाव, सुशिल शिंदे, राजु मोरे, सुहास चौधरी, रुपाली पाटील, कोमल पाटील जिल्हा कार्यध्यक्ष, दिव्या यशवंत भोसले किरण राजपूत, मनोज वाणी, राहूल टोके पुरुषोत्तम चौधरी, जितेंद्र बागरे, उज्वल पाटील, संजय चव्हाण, बाळकृष्ण सुर्यवंशी, आरोही नेवे यांनी केली.