अमरावती राजमुद्रा दर्पण । राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहे. कालपासून अमरावती शहरात प्रचंड दणाव आणि दशहतीचे वातावरण आहे. अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला असून दुकानांची तोडफोड केली जात आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आजही दिसत आहे. आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.
अमरावतीत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल घडलेल्या हिंसाचारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी येथील भाजप नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज्यातील सरकारविरोधात सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी केले आहे.