भुसावळ राजमुद्रा दर्पण । ग्राम पंचायत किन्हीच्या वतीने सर्वोदय हायस्कूल, किन्ही येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आणि १० वी व १२ वी उतीर्ण गुणवंत विद्यार्थी, कोरोना योद्धे व प्रगतशील शेतकरी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे व भुसावळ विधानसभा आमदार संजयजी सावकारे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास सर्वोदय हायस्कूल किन्हीचे अध्यक्ष सुरेशदादा येवले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजयजी सावकारे यांच्यासह सर्वोदय हायस्कूल किन्हीचे अध्यक्ष सुरेशदादा येवले, पं.स.भुसावळ सभापती वंदनाताई उन्हाळे, पं.स. उपसभापती प्रितीताई पाटील, पं.स. सदस्य मनीषाताई पाटील, पं.स. सदस्य सुनिलभाऊ महाजन, किन्ही सरपंच निलमताई सचिन सोनवणे, उपसरपंच जयंत जगन्नाथ पाटील यांच्या सह किन्ही ग्रा.प.सदस्य व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.