जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगावचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थांच्या १४९ वर्षाची अखंड परंपरा असलेला श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारतीय परंपरेनुसार रामाला मानणारा हिंदू धर्म मोट्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष रथोत्सव होऊ शकला नाही. या वर्षी परवानगी मिळाल्याने रथोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सर्वच लोकांना दर्शन घेण्याची खूप उत्सुकता आहे. कोरोनामुळे होणारी महामारी आपल्याला सर्वाना टाळायची आहे, तरी सर्व भाविकांनी आहे तिथून व नियमांचे पालन करून श्रीराम रथाचे दर्शन घ्यावे असे आवाहन आमदार राजू मामा यांनी केले आहे.