जामनेर राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू हे उद्या दिनांक १६ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत .चाळीसगाव येथे त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्ताने त्यांची जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांची कॉर्नर भेट होणार आहे. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बोदवड चौफुलीवर जामनेर तालुका प्रहार जनशक्ती कार्यकर्त्यांशी आमदार बच्चु कडू चर्चा करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके यांनी दिली.
मलकापूर नांदुरा, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव याठिकाणी कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटीत अडीअडचणी समजून घेत मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यासह परिसरातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जामनेर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गायके, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोजकुमार महाले शहर अध्यक्ष वसंत माळी आणि युवक प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष मयुर पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख जीवन सपकाळ यांनी केले आहे. सोबत उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी उपस्थित राहणार आहेत.