दिल्ली राजमुद्रा दर्पण। अर्थव्यवस्थेवर असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे झालेली हानी, तसेच त्यातून सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय चर्चेमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआसी बँक, कोटक महिंद्रा बँक, चोलामंडल इन्वेस्टमेंट, श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस आणि टाटा कॅपिटल यांचे सीईओ सहभागी होणार आहेत.
या बैठकीमध्ये विविध उद्योगांना करण्यात येणाऱ्या अर्थपुरवठ्यावर देखील चर्चा होणार आहे. स्टार्टअपला कशापद्धतीने जास्तीत जास्त कर्ज देण्यात येऊ शकते, तसेच कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांची भूमिका काय हवी यावर देखील चर्चा होणार आहे. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान कोरोनाच्या सावटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या उद्योजकांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख बँकांकडून कर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून 31 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 63,574 कोटी रुपयांचे लोन वाटप करण्यात आल्याची माहिती बँकांच्या वतीने देण्यात आली.