मुंबई राजमुद्रा दर्पण। काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांवर देखील आरोप केले होते. खोतकर यांनी भडकाऊ भाषण करुन दंगल भडकावली असल्याचे राणे म्हणाले होते. आता याला अर्जुन खोतकरांनी उत्तर दिले आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले की, अर्जुन खोतकर म्हणाले की मी नांदेडला गेलोच नव्हतो, जालन्यात होतो. त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहनच केले आहे. नितेश राणे म्हणाले होते की, राज्यात काही ठिकाणी झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणला. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नितेश राणेंनी केली होती. तसेच रझा अकादमीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर अफवा पसरवत होते. तेव्हा पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता, रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली? असा सवालही नितेश राणेंनी विचारला आहे.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, 2012 मध्ये मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात झालेला हिंसाचार, भिवंडीत या संघटनेच्या जमावाने पोलिस स्थानकावर हल्ला चढवून दोन पोलिसांची केलेली हत्या या घटनांची आठवण नितेश राणेंनी करुन दिली.