(राजमुद्रा वृत्तसेवा)
भारतीय रिझर्व बँकेने केंद्र सरकारला नुकताच ९९ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा येणारा पैसा कशाप्रकारे वापरावा याचा सल्ला मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला असून हा पैसा लसीकरणासाठी वापरावा असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर वरुन ही माहिती दिली आहे. सध्या देशाला लसीकरणाची फार मोठी गरज आहे त्यामुळे आरबीआय कडून येणारा हा ९९ हजार १२२ कोटींचा निधी लसीकरणासाठी वापरण्यात यावा असा सल्ला त्यांनी आपल्या ट्विटवरून केंद्र सरकारला दिला आहे.