जळगाव राजमुद्रा दर्पण । भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष मा.दिपक सुर्यवंशी यांनी सामाजिक कार्यकर्त व अश्फाक फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक मुनाफ शेख यांची अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्याना मा जलसंपदा मंत्री आ. गिरिश महाजन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा), महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अश्फाक शेख यांनी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीच्या अल्पसंख्यांक समाज व युवकासाठी सुरु असलेले उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका निभाऊ व जास्तीत जास्त युवकांना त्यांच्या कार्यात सहभागी करू असा विश्वास व्यक्त केला आहे.
अश्फाक शेख अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शैबाज शेख, महानगर जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष साबीर गुड्डू पठाण, मंडल अध्यक्ष अजित राणे, विनोद मराठे, परेश जगताप, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, नगरसेवक सुरेश सोनवणे, मनोज भांडारकर, आनंद सपकाळे, शाईद शेख व विविध समाजातील प्रमुख कार्यकर्त व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.