मुंबई राजमुद्रा दर्पण । उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राज्यात प्रत्येकजण स्वत: मुख्यमंत्री समजतो ही चांगली गोष्ट आहे. ही लोकशाहीची ताकद आहे, असं सांगतानाच केंद्रातील मोदी सरकारमध्ये मात्र, कोणत्याही मंत्र्याला ते मंत्री आहेत असं वाटत नाही. एवढंच काय खासदारांनाही ते खासदार आहेत, असं वाटत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महान योद्धा होते. मराठी माणसासाठी हिंदुंसाठी ते लढवय्ये महानायक होते. त्यांचा आदर्श प्रेरणा आमच्या मनात कायम आहे. केवळ एका दिवसासाठी नव्हे तर त्यांच्या स्मृती मनात अखंड असतात. बाळासाहेब असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. नेमका कोणत्या गोष्टीला ब्रेक लागला असता हे आता मी सांगत नाही. पण ठाकरेंनी या देशाला राष्ट्रभक्तीचं हिंदू विचाराचं तेज प्राप्त करून दिलं. हिंदू या पुढे मार खाणार नाही हे बळ या देशाला देण्याचं काम त्यांनी केलं. हिंदू पळपुटा नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. मराठी माणसाच्या मनगटात चेतना जागवली, असं त्यांनी सांगितलं.
निवडणुका येतात तेव्हा हे लोक हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करतात. भारत-पाकिस्तान वाद काढतात. निवडणूक जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीत. दंगल भडकावी आणि हिंसाचार व्हावा असं या लोकांना वाटतं. हे लोकं कोण आहेत सर्वांना माहीत आहे. पार्टी प्रमुख उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना खुले आव्हान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.