जळगाव राजमुद्रा दर्पण । हिंदू हृदयसम्राट व शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त युवा सेना जळगाव जिल्हा आणि शिवसेना, बळीराम पेठ शाखेतर्फे भव्य लसीकरण शिबिर बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले. लसीकरण शिबिर सकाळी ९ वाजेपासून सुरू झाले. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
शिबिराच्या सुरुवातीला महापौर जयश्री महाजन यांनी शिवसेना संस्थापक तथा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी, माजी नगरसेवक सुनील माळी, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष संजयकुमार गांधी, शिवसेना बळीराम पेठ शाखेचे प्रमुख निर्भय पाटील, बिपिन पवार, जितेंद्र बागरे, संदीप ढंढोरे आदी उपस्थित होते. शिबिरासाठी आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी ललित भोळे, विपिन पाटील, अनिल गवळी, महेश पाटील, नितीन चंदनकर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.