पुणे राजमुद्रा दर्पण। सीएनजीच्या दरात 1 रुपया 80 पैशाची वाढ करण्यात आली असून, शहरात सीएनजीच्या 1 किलोसाठी 63.90 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज कोणतीही वाढ झालेली नाही.
देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले होते. पूर्वीचा अॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली होती. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्यादेखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. कोरोना संकटामुळे अगोदरच रडतखडत सुरु असलेल्या पुण्यातील PMPML बस सेवेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत होता. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वेगाने वाढ झाली आहे.