पहुर ता.जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा| जळगाव तसेच राज्यभरात जोकर मायक्रो च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्वत्र भयावह वातावरण असताना पहुर येथे जिल्ह्यातील पहिलं युवर माय प्रोसेस रोग निदान शिबिर संपन्न झाले आहे. आरोग्य शिबिराचे आयोजन जीएम फाउंडेशन व आर्या फाउंडेशन माध्यमातून करण्यात आले होते. गरजू रुग्णांनी यावेळी शिबिराचा लाभ घेतला आहे.
पहूर ग्रामीण रुग्णालयात घेतलेल्या या शिबिरामध्ये सुमारे 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली यानंतर दर सोमवार व शुक्रवारी नियमित तपासणी करण्यात येणार असून गरज पडल्यास संशयित रुग्णांची सिटीस्कॅन पी. एन. एस आमदार गिरीश महाजन यांच्या तर्फे विनामूल्य करण्यात येणार आहे
आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी जि. प सदस्य राजधर पांढरे होते यावेळी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉ हर्षल चांदा, समाधान पाटील चेतन रोकडे आधी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ वानखेडे, चेतन रोकडे, डॉ संदीप कुमावत, डॉ बाविस्कर ,पोलीस पाटील मधुकर सोनवणे, डॉ योगेश ढाकरे, दिपक वाघ, अंजना नागरगोजे, विकास गायकवाड, सतीश बनसोडे, प्रमिला गोयर, यांनी परिश्रम घेतले यावेळी मार्गदर्शक डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांनी केले प्रास्ताविक अरविंद देशमुख यांनी केले.