मुंबई राजमुद्रा दर्पण । हे ठाकरे सरकार आहे, इथं कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही, असं प्रत्युत्तर राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. विरोधी पक्षनेते राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे एका बाजूवर गुन्हा दाखल होतो, असं म्हटलं जातं. ज्यांनी अमरावती पेटवली,ज्यांनी अमरावतीचं नुकसान केलं त्यांना सोडलं जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणताही एक गट नाही. ते दंगेखोर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केलीय. यासंबंधी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात बंदी का घातली नाही, असं संजय राऊत म्हणाले. रझा अकादमीवर बंदी घालण्याबाबत गृहमंत्री, कॅबिनेट आणि मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील.