पुणे राजमुद्रा दर्पण । त्रिपुरा येथील मशिदीच्या घटनेचं पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. अनेक शहरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्यांच्या दरम्यान मालेगाव, नांदेड व अमरावतीमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ भाजपनं आज पुण्यात धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
‘हिंदू के सन्मान मै भाजप है मैदान मै’ अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. ‘हल्लाबोल’ , ‘जय श्रीरामाच्या घोषणा’ ही देण्यात आल्या. या दंगलीमुळे पुण्यातील ग्रामीण भागातही कलम 144 चे आदेश देत जमावबंदी लागू करण्यात आली होती. याबरोबरच राज्यातील मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, नांदेडसहा ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले होते.
रझा अकादमीने मोर्चे काढत दंगली घडवण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करत हिंसाचार घडवला. मात्र महाविकास आघाडी सरकारने दंगली घडवणाऱ्यांना पाठीशी घातलं. याउलट शांततेसाठी व स्वतः:च्या सरंक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलया नागरिकांवर लाठीचार्ज करत खोटे गुन्हे दाखल केले. इतकंच नव्हे तर महाविकस आघाडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं महाविकास आघाडीमुळंच या दंगली महाराष्ट्रात होत आहेत. त्याचाच निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या कृतीसाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो. असेही जगदीश मुळीक म्हणाले. या आंदोलनात युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने घटनेतील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी या वेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.