जळगाव राजमुद्रा दर्पण । एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर आहे. यामुळे बससेवा थांबलेली आहे. परंतु, बससेवा सुरळीत करण्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना संधी देखील रविवारी पोलिस बंदोबस्तात सेवा सुरू केली. मात्र ही सेवा दुसऱ्या दिवशीच बस सेवा बंद पडली.
बससेवा सुरळीत करण्याच्या हेतूने भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना महिनाभराची तात्पुरती नियुक्ती देत सेवा सुरू केली. मात्र जळगाव बसस्थानकातून सोडलेली धुळे बस एरंडोल येथे अडवून परत पाठविली. तर चोपडा मार्गस्थ झालेल्या बसवर ममुराबाद येथे अज्ञातानी दगडफेक केली. यामुळे नवीन नियुक्त झालेल्या चालकांमध्ये भिती निर्माण झाली. या भीतीपोटी ते चालक आज ड्युटीवर आलेच नाही. यामुळे बससेवा थांबली आहे.