दिल्ली राजमुद्रा दर्पण। केंद्रीय मान्यता व नियंत्रण समितीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. दरम्यान याच बैठकीमध्ये शहरी भागात 3.61 लाख घरांच्या निर्मितीसाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान आवास योजना ही एक केंद्राची महत्त्वाची योजना आहे. यो योजनेतंर्गंत शहरी व ग्रामीण भागामध्ये घरी खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पीएम आवास योजनेंतर्गत आणखी 3.61 लाख घरांच्या निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने शहरी भागांमध्ये 3.61 लाख घरांच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. ज्यांच्या नावावर पूर्वचे एखादे घर नाही, अशा व्यक्तींना घर खरेदीसाठी पीएम आवास योजनेंतर्गंत सबसीडी देण्यात येते. केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 56 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.