जळगाव राजमुद्रा दर्पण। जळगाव बाजारात सात्यत्याने सोन्याचे भाव हे चढ उतार होत राहतात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे. तसेच सराफ बाजारात आज दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करण्यांसाठी चांगले प्रतीके आहेत तसेच चांदीचे भाव देखील २११० प्रति किलो झाली आहे. काल २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,०५० हा असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६,०९० असा होता.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल दीड हजार रुपयांनी उतार चढ झालेला दिसून येत आहे. सोन चांदीच्या दरात नोंव्हेबर महिन्यात चांगली घट नोंदविण्यात आल्याने सध्याचा काळ सोन व चांदीच्या खरेदीसाठी चांगला मानला जात आहे.
लग्नसराई लक्षात घेता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान लग्नसराई सोन्याच्या दर वाढला तरी वाढ किंचित असेल असंही जाणकरांचं म्हणण आहे .