मुंबई राजमुद्रा दर्पण । विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 10 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे असणार आहेत. तर काँग्रेसच्या नेत्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसह राज्यात इतर ठिकाणीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून धावपड सुरू आहे.
धुळे-नंदुरबार, वाशिम – बुलढाणा – अकोला, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मुंबईच्या दोन जागांसह होणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी कडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची याबाबत बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. कुठे उमेदवार मागे घेता येतील, ह्याची झाली चाचपणी केली जात आहे.
दरम्यान, दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. संजय केणेकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.