दिल्ली राजमुद्रा दर्पण। भारत बायोटेकद्वारे विकसित या लसीच्या कार्यक्षमतेच्या पहिल्या रिअल-वर्ल्ड अभ्यासाचे परिणाम अलीकडेच लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय प्रकाशित झाले आहेत. हा निष्कर्ष देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान दिल्ली एम्समध्ये कार्यरत २,७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांवरील अभ्यासाच्या आधारावर काढण्यात आला आहे. अभ्यासात सहभागी दिल्ली एम्समधील मेडिसिनचे प्रा. डॉ. मनीष सोनेजा यांच्यानुसार, अभ्यासासाठी निवड झालेल्या सर्व २,७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांत कोरोनाची लक्षणे होती. सर्वांची आरटीपीसीआर करण्यात आली त्यात १,६१७ आरोग्य कर्मचारी संक्रमित आढळले.
देशात लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांनाच सर्वात आधी लस देण्यात आली होती. चाचणीत सहभागी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिनचे दोन डोस आरटीपीसीआर चाचणीच्या किमान १४ दिवस आधी देण्यात आले होते. पहिल्या चाचणीनंतर ७ दिवसांच्या कालावधीतही कोव्हॅक्सिनची प्रभावशीलता ५०%च राहिली.कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या निकालात लस ७७.८८% प्रभावी असल्याचे आढळले होते, पण त्यांच्या शोधाचे निष्कर्ष त्यापेक्षा वेगळे आहेत हे संशोधकांनी मान्य केले. तथापि, संशोधकांच्या मते, त्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण- हा अभ्यास सामान्य जनतेवर नव्हे, तर ज्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला.