मुंबई राजमुद्रा दर्पण । आझाद मैदानावर एसटी महामंडळाच्या वतीने हायकोर्टात भूमिका मांडणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पहिली पत्रकारपरिषद घेतली. खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरीही हा लढा थांबणार नाही. यावेळी विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.
एसटी महामंडळाच्या कर्मचारी आंदोलनात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी शिवसेनेचे खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे असे ते म्हणाले. तसेच संजय राऊत हे माझे मित्र आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. इथे घडलेले विद्यार्थी कायम तठस्थतेची भूमिका घेतात. मात्र संजय राऊत यांची सध्याची भूमिका लज्जास्पद असल्याची टीका अॅड. सदावर्ते यांनी केली.