मुंबई राजमुद्रा दर्पण। डिसेंबर मध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या ‘अतरंगी रे’ या नवीन चित्रपटाला आतापर्यंतची सर्वात मोठी डील मिळाली आहे. माहितीनुसार, हॉटस्टारने अतरंगी रे हा चित्रपट तब्बल 200 कोटी रुपयांना विकत घेतला आहे, जी डायरेक्ट OTT रिलीजसाठी आतापर्यंतची बॉलिवूडची सर्वात मोठी डील आहे. अतरंगी रे ला मिळालेल्या डीलवरून हे स्पष्ट झाले आहे की, थिएटर उघडल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म यूजर्सना आकर्षित करण्यासाठी बड्या स्टार्सचे चित्रपट डायरेक्ट OTT रिलीजसाठी मोठ्या किंमतीत खरेदी करण्यास तयार आहेत.
अशा प्रकारे, कलेक्शनच्या बाबतीत, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाचा निर्मिती खर्च जवळपास 120 कोटी रुपये आहे, 200 कोटींच्या ओटीटी डीलमुळे हा चित्रपट रिलीज न होताच सुपरहिट ठरला आहे.सलमान खानचा ‘अंतिम’ हा चित्रपट डायरेक्ट ओटीटी रिलीज होणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते, पण थिएटर सुरू झाल्यानंतर सलमान खानने निर्णय बदलला आणि तो आधी थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.