(राजमुद्रा वृत्तसेवा)
देशात सध्या कोरोना रुग्णसंख्या घसरताना दिसत आहे. तर करोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम असून देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली आहे. गेल्या २४ तासांत ४,४५४ रुग्णांना करोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत त्यामुळे चिंता काम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार दिवसभरातील करोना आकडेवारी जाहीर केली.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत दोन लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात ३ लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २,६७,५२,४४७ इतकी झाली आहे.