चाळीसगाव राजमुद्रा दर्पण । चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंदी आहे. तरी कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ समोर आला होता. हा सर्व प्रकार उघड आणण्यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. ग्रामीण पोलिसांचा वसुलीचा प्रकार समोर आला आहे.
ग्रामीण भागात गुरे चोरी व इतर गुन्हांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा तपास करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना वेळ नाही. परंतु कन्नड घाटात वसुली करण्यासाठी आधिकारी व कर्मचारी स्वता; हजर राहतात. त्यामुळे वसुलीत शामिल सर्व आधिकारी व कर्मचार्यांची निलंबनाची मागणी येत्या आधिवेशनात करणार आहे. तसेच तालुक्यात सुरु असलेले अवैद्य धंदे बंद करण्यासाठी माझी मोहिम सुरुच राहणार असे आमदार मंगेश चव्हाण म्हणले.
आमदार मंगेश चव्हाण ड्रायव्हर बनून त्या घाटातून प्रवास केला. पोलिसांना म्हणाले, ‘थोडे कमी करा’ अन् ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले. तसेच उर्वरित पैसे परत मागितले असता त्या पोलिसांनी ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी तेथून पळ काढला.
दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी खेळाचा प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आला आहे.